होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

राजगुरूनगर येथून गायब झालेल्या मुलाचा खून, कालव्याच्या वाहत्या पाण्यात मुलाला फेकल्याची आरोपीची कबुली

विभाग : क्राईमन्युज / 18 Aug 2018, 06:08AM
शेअर करा.

राजगुरूनगर येथून गायब झालेल्या मुलाचा खून, कालव्याच्या वाहत्या पाण्यात मुलाला फेकल्याची आरोपीची कबुली

रामचंद्र सोनवणे:  पुणे स्टार न्यूज नेटवर्क 

राजगुरूनगर : स्वातंत्र्य दिनी मैदानावर मित्रांसोबत खेळत असताना गायब झालेल्या सुमित रविंद्र सावंत,वय १० वर्ष, रा राजगुरूनगर याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी एका संशयित इसमास ताब्यात घेतल्यावर मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याला पळवून नेऊन चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली या आरोपीने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.

मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत. हा मुलगा हुतात्मा राजगुरु विद्यालयाच्या मैदानात खेळत असताना बुधवारी (दि.१५) दुपारी गायब झाला होता. अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून किंवा कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे, अशी तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि १७) दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधातून मुलाचा खून झाल्याचे बोलले जात आहे. कोवळ्या वयाच्या मुलाच्या खुनाबद्दल शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ह्या विभागातील इतर बातम्या