होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकार पुरस्कार प्रदान

विभाग : टॉप स्टोरी / 14 Aug 2018, 01:08PM
शेअर करा.

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकार पुरस्कार प्रदान

पुणे : आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना ज्‍येष्‍ठ शिक्षणतज्ञ तसेच माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले आणि माजी न्‍यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. पुण्‍याच्‍या  विनोद विद्यापीठ येथे आचार्य अत्रे  स्मृती प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्‍कार  देण्‍यात येतो.

राजेंद्र सरग सध्‍या पुण्‍याला जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवेत आहेत. राजेंद्र सरग यांना यापूर्वी महाराष्‍ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार तसेच इतर पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.

आचार्य अत्रे  मराठी संस्कृती जपणारे एक बहुगुणी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार ज्या मान्यवरांनी स्वीकारले त्यांची सामाजिक जबाबदारी वाढली आहे. आचार्य अत्रे ह्या नावाचे वलय प्रत्येक क्षेत्रात आहे. राजकारणसाहित्यसमाजकारणनाटक,चित्रपटलेखक अशा विविध कलागुणांनी  समृध्‍द असणारे व्यक्तीमत्व म्हणजे अत्रेअसे प्रतिपदन निवृत्त न्यायमूर्ती श्री. प्रमोद कोदे यांनी केले.

कार्यक्रमात नाट्यकर्मी अशोक समेळप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबुराव कानडे, शाल्‍मली कुलकर्णी  आदींची उपस्थिती होते. निवृत्त न्यायमुर्ती श्री. कोदे म्हणालेआचार्य अत्रे ही व्यक्ती मराठी मनांवर अधिराज्‍य  गाजवते. मराठी संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केले. हास्याचा बुध्दीशी संबंध आहे त्यामुळेच विनोद निर्माण करणारी व्यक्ती बुद्धीवंत असते. आजच्या युगात हसण्यावर मर्यादा येत आहे, पण पोटभर हसणे गरजेचे आहे. व्यंग किंवा विनोद जीवघेणा नसावा याचे भान असले पाहिजे.  हसणे ही जीवनाची संजीवनी आहे. प्रारंभी आचार्य अत्रे यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. यावेळी अनेक रसीक उपस्थित होते.

ह्या विभागातील इतर बातम्या