होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

ग्रामीण भागातील शाळांना खाजगी कंपन्यांचा मदतीचा हात

विभाग : शैक्षणिक / 01 Aug 2018, 07:08AM
शेअर करा.

ग्रामीण भागातील शाळांना खाजगी कंपन्यांचा मदतीचा हात

बजाज तर्फे खडकवाडी शाळेला स्वच्छतागृह बांधकामासाठी दहा लाख रु निधी

अंकुश भूमकर - Pune Star News Network 

लोणी-धामणी : ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी  लागणारी शैक्षणिक मदत तसेच भौतिक सुवीधा पुरवण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी कंपन्या पुढाकार घेताना दिसून येत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा आता हायटेक बनू लागल्या आहेत .

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खडकवाडी येथील माध्यमिक शाळेला बजाज अर्पण ग्रुप व जानकीदेवी बजाज ग्राम विकास सेवा संस्था आकुर्डी यांच्या वतीने स्वच्छतागृह बांधकामासाठी दहा लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे .

रविवार दि. 29 जुलै रोजी बांधकाम करण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे व जि प शाळेच्या वाचनालयाचे उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी व बजाज ऑटो कंपनीचे उपाध्यक्ष व्ही.रमेश यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.बजाज कंपनीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली .यावेळी कै. ज्ञानेश्वर बाबुराव वाळुंज यांच्या स्मरणार्थ राहुल वाळुंज यांनी जि. प.शाळेस अडीच लाख रुपयांची खेळणी दिली.

यावेळी बजाज ऑटो कंपनीचे पंकज बल्लभ, लीना राजन ,चंद्रकांत चौधरी, प्रवीण रस्तोगी, विजय उत्तरवार,गिरीष गायकवाड, सरपंच अनिल डोके,माजी उपसरपंच किरण वाळुंज,गुलाब वाळुंज, नाथा सुक्रे, माजी प स सदस्य बाळासो सुक्रे,प्रदीप वाळुंज,शरद वाळुंज, दिलीप डोके,सुरेश सुक्रे,राहुल वाळुंज,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिंदे, जि प शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला लंगडे उपस्थित होते.


ह्या विभागातील इतर बातम्या