होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

वृक्ष लागवडीचा शासनाचा अट्टाहास, संवर्धनाची मात्र बोंब

विभाग : महत्वाच्या बातम्या / 14 Jul 2018, 01:07PM
शेअर करा.

वृक्ष लागवडीचा शासनाचा अट्टाहास, संवर्धनाची मात्र बोंब 

अंकुश भूमकर - Pune Star News Network 
लोणी-धामणी : भविष्यातील जगापुढील सर्वात मोठे संकट असणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंग वर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. पृथ्वीतलावर बदलत्या वातावरणाशी अहोरात्र  झुंज देणाऱ्या महाकाय वनसंपत्तीचा वर्षानुवर्षे ऱ्हास होत चालला असुन त्याची जागा सिमेंट च्या जंगलांनी व्यापली आहे. हा मानवनिर्मित वाढत चाललेला पसारा पर्यावरण ला भविष्यात धोक्याची घंटा मानली जात आहे  त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाला अडसर ठरणाऱ्या समस्याचा पाढा मानवाला एक ना एक दिवस तरी ऑक्सिजन विकत घ्यायला भाग पडणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे  महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरु केली आहे. त्या योजनेच्या माध्यमातुन मोठा गाजावाजा करत दरवर्षी वृक्ष लागवड करुन लाखो रुपये खर्च केला जात आहे. मात्र या लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याने या तीन वर्षात लावलेली किती झाडे जगली हे शासनाने जाहीर करावे अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे.

शत कोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातुन शेतकर्यांना बळकटी देण्याची गरज         

तीन वर्षांपूर्वी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना अंमलात आणली. त्या प्रमाणे दर वर्षी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रात वृक्षलागवड केली जात आहे. या ही वर्षी 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून वन विभागासह, सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, खाजगी स्वयंसेवी संस्थांनी या कामात उस्फुर्तपणे सहभाग घेतलेला दिसून येत आहे. भारतातील 55 ते 60 टक्के लोक संपूर्ण शेतीवर अवलंबून असून शेतकऱ्यांचे सक्षमिकरण करण्यासाठी तसेच भविष्यात  स्वच्छ पाणी, हवा, स्वच्छ पर्यावरणसाठी राज्य सरकार च्या नविन धोरणानुसार वृक्ष लागवडीसाठी फक्त निधी  उपलब्ध करून दिला आहे. तो ज्याप्रमाणात खर्च होतो त्या प्रमाणात वृक्ष संवर्धन होत नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करुन ते वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामऴे या वृक्षलागवडीसाठी शासनाने गरजु शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मुख्य प्रवाहात आणणे, प्रबोधन करून त्यांची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी त्यांच्या शेतात अथवा शेताच्या बांधावर आर्थिक उत्पन देणारी झाडे लावुन शेतकर्यांचे  उत्पन्न वाढवण्यासाठी  पुढाकार घ्यायला हवा. परंतु  ह्या वर्षीपासून शेतकर्यांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने एक वेगळे पाऊल उचलले आहे.
या प्रमाणे वनक्षेत्र, गायरान, पडीक तसेच खाजगी जमीन, शेताच्या बांधावर इ ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र वनविभागाने या योजनेकडे जाणीवपुर्क दुर्लक्ष केले आहे. या योजनेबाबत शेतकर्याना कोणतीच माहीती देण्यात आली नसुन शेतकर्यांना या योजनेत सहभागी करुन न घेता वनक्षेत्रातच झाडे लावली जात आहेत व बिले काढली जात असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

लोकसहभाग वाढण्यासाठी प्रबोधन गरजेचे

दरवर्षी वृक्ष लागवड पूर्व तयारीसाठी वारेमाप खर्च केला जातो. स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यासाठी तीन ते चार महिने अगोदर रोपवाटिका तयार करणे, लागवडीसाठी खड्डे तयार करणे. वाहतूक जाहिरात, प्रबोधन, जनजागृती कार्यक्रम इ. साठी  होणारा खर्च विचारात घेता व प्रत्यक्षात त्याचा किती फायदा होतो का? वृक्ष लागवडी पासून संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी आवश्यक आहे तो लोकसहभाग .शासन स्तरावर वृक्ष लागवड व संवर्धनासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढवा तसेच शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या शेताच्या बांधावर फळ झाडांची लागवड करावी म्हणजे भविष्यात या झाडांपासून येणाऱ्या उत्पन्नचा फायदा त्याला होईल. गावागावातील ग्रामसभेत वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितल्यास लोकसहभाग तर वाढेल त्याबरोबर उत्पन्न वाढेल. त्यासाठी शासनाच्या कृषी व वन विभागाने वृक्ष लागवड व संवर्धन या विषयी जनजागृती करणे आवश्यक आहे.

पाण्याची व्यवस्था सक्षम असणे गरजेचे

वृक्ष लागवड ही साधारण जून ते ऑक्टोबर महिन्या पर्यंत चालू असते या दरम्यान पाऊस चालू असतो. वृक्ष लागवडीनंतर पाण्याची खरी गरज असते ती फेब्रुवारी ते मे महिन्यात. काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने वृक्ष संवर्धन अशक्य आहे. अश्या ठिकाणी स्वयंसेवी संस्था, गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी या काळात पाणी उपलब्धता कमी असल्याने अश्या वेळी टँकरने पाणी उपलब्ध करून ठिबकद्वारे पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र अशी व्यवस्था न केल्याने दरवषी लावलेल्या लाखो झाडांपैकी बहुतेक झाडे पाण्याअभावी सुकुन जात आहेत.

फक्त जाहिरातबाजी नको प्रत्यक्ष कृती हवी

वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी गावागावात लोकप्रतिनिधी चे मोठे मोठे फ्लेक्स लावले जातात. सोशल मीडिया वर जाहिरात बाजी केली जाते. उद्घाटन खर्च वारेमाप केला जातो. वृक्ष लागवडीचे फोटो शेषन केले जाते मात्र उद्घाटनानंतर वर्षभर त्या लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते. सध्या सोशल मीडिया वर वृक्ष लागवडीचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. माञ वृक्ष संवर्धन करुन मोठे वृक्ष कोणीच सोशल मिडीयावर दाखवत नाही. यावरुन वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणीच धजावत नसल्याचे जाणवते. बऱ्याचदा वृक्ष लागवड वर्षानुवर्ष त्याच त्याच  खड्ड्यात  व चरांमध्य् केली जाते आहे. एकंदरीत वृक्ष लागवडीच्या जाहिराती पेक्षा प्रत्यक्ष कृतीतुन संवर्धनाची जबाबदारी  शासनाने व लोकप्रतिनीधी व सामाजिक संस्थांनी उचलली पाहिजे. तरच वृक्षलागवड योजना न राहता चळवळ होईल

शासनाने लागवडी नंतर दरवर्षी जगलेल्या वृक्षाची आकडेवारी जाहीर करावी

जून ते ऑक्टोबर महिन्यात वनक्षेत्रात कोट्यवधी रोपांची लागवड केली जाते. त्यातील 30 ते 40 टक्के रोपेच जगतात त्यामुळे वर्षभराने  प्रत्यक्षात किती झाडे जगली आहेत याची आकडेवारी शासनाने जाहीर करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडी नंतर ची जबाबदारी महत्वाची असून लावलेल्या रोपांचे शेळ्या, मेंढ्या इ जनावरांपासुन  संरक्षण करणे आवश्यक आहे. तसेच वृक्ष तोड, जंगलांना लागणारे वणवे रोखण्यासाठी जनजागृती  व उपाययोजना झाली पाहिजे. अन्यथा शासनाने वृक्ष लागवडीचा नुसता अट्टहास करून उपयोग नाही त्यासाठी वृक्ष संवर्धन बाबतच्या ठोस उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. तरच वृक्षलावड होवुन संवर्धन होईल.

आंबेगाव तालुका वन परिक्षेत्रात मागील वर्षी केलेल्या वृक्ष लागवडी पैकीं जवळपास 75 ते 80 टक्के रोपे सुरक्षित आहेत .ह्या वर्षी साडेसात ते आठ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून वृक्ष लागवड करताना खड्ड्यामध्ये रोपांबरोबर बिया सुद्धा लावण्यात आल्या आहेत जेणेकरून बियांपासून तयार झालेले रोप किंवा लागवड केलेले रोप यापैकी एक किंवा दोन्हीपण अशी जास्तीत जास्त रोपे जगवण्याचा प्रयत्न आहे. हया वर्षी लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी रोजंदारीवर मजूर घेणार असुन 90 ते 95 टक्के वृक्ष संवर्धन करणार आहे
 - प्रज्योत द. पालवे (वन परिक्षेत्र अधिकारी मंचर)
 
शासनाच्या वनविभागाच्या वतीने लाखो वृक्ष लागवड केली जाते परंतु प्रत्यक्षात मात्र किती रोपे शिल्लक राहतात याची आकडेवारी जाहीर केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य थोडे कमी ठेवले तरी चालेल परंतु वृक्ष संवर्धनावर जास्तीत जास्त भर देणे गरजेचे आहे.
- नानासाहेब ढोबळे (वृक्ष प्रेमी-पारगाव शिंगवे )

ह्या विभागातील इतर बातम्या