होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंनी केला चाळकवाडी टोल नाका बंद

विभाग : पुणे जिल्हा ग्रामिण / 13 Jul 2018, 12:07PM
शेअर करा.

जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंनी केला चाळकवाडी टोल नाका बंद 

अतुल बेनकेचा टोलनाका मुद्दाच आमदारांनी केला हायजॅक....

मंचर (प्रतिनिधी)  जुन्नर तालुक्याचे राजकारण आगामी काळात चाळकवाडी टोलनाक्याभोवतीच फिरणार असे चित्र तयार झाले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी 15 जुलै रोजी चाळकवाडी टोलनाका बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी मोठी जय्यत तयारी अतुल बेनके यांनी केली असताना आज आ.शरद सोनवणे यांनी स्वत:मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बोलावुन टोलनाका बंद केला. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत  टोलनाक्यावरुन राजकारण होवुन आपल्याच माथी खापर फोडायला विरोधकांच्या हाती असलेला मुद्दा आज आ.सोनवणेनी हायजॅक केला. 

जुन्नरचे राजकारण आ.सोनवणे यांच्याच भोवती फिरत आहे. ते 2019 ची विधानसभा निवडणुक कोणत्या पक्षातुन लढवणार याबाबत कोणालाच खात्री नाही. त्यामळे शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील विधानसभेसाठी इच्छुक  असणार्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. या सर्वच इच्छुकांनी एकत्रित येवुन आ.शरद सोनवणे यांना घेरण्यासाठी त्यांना टार्गेट करणे सुरु केले आहे. 

त्याचाच एक भाग म्हणुन राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन 2019 ला विधानसभेसाठी इच्छुक असणारे अतुल बेनके यांनी चाळकवाडी टोलनाका बंद करण्याची हाक  दिली होती. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. शिवाय या टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन अतुल बेनके व शिवसेनेकडुन विधानसभेसाठी इच्छुक असणार्या उमेदवारानीही आ.सोनवणे यांच्यावर आरोप केले होते. 

त्यामुळे आगामी विधानसभा चाळकवाडी टोलनाका या विषयावर गाजणार व आ.सोनवणेना सर्वच विरोधक या मुद्दयावर घेरणार असे वाटत असताना आ.सोनवणेनी आज चाळकवाडी टोलनाका बंद केला. आ.सोनवणे यांना घेरण्यासाठी उपस्थित केलेला मुद्दाच आ.सोनावणे यांनी गायब केला आहे. त्यामुळे आगामी काळात जुन्नरच्या राजकारणात आ.शरद सोनवणे यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधी इच्छुक उमेदवार नविन मुद्दा काय शोधणार?  याबाबत जुन्नर तालुक्यात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

जोपर्यंत रस्त्यांची, पुलांची व बाह्यवळणाची कामे पूर्ण होत नाही तसेच बाधित शेतकर्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम व इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत चाळकवाडी टोलवसुली करू देणार नाही असेही यावेळी आ.शरद सोनावणे यांनी जाहीर करत टोल बंद केला.

ह्या विभागातील इतर बातम्या