होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

विधानसभा प्रश्नात्तरे : राज्यातील विद्युत खांब, तार व यंत्रणा दुरुस्तीसाठी 7 हजार 300 कोटींचा आराखडा - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विभाग : विधीमंडळ / 13 Jul 2018, 10:07AM
शेअर करा.

विधानसभा प्रश्नात्तरे : राज्यातील विद्युत खांब, तार व यंत्रणा दुरुस्तीसाठी 7 हजार 300 कोटींचा आराखडा - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यात जुने विद्युत खांब, तार व यंत्रणा याची गेल्या तीस वर्षापासून देखभाल दुरुस्ती झालेली नाही, त्याकरिता 7 हजार 300 कोटींचा आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

ऊर्जा मंत्री म्हणाले, यासाठी विभागाने राज्यात 21 हजार अपघात प्रवण क्षेत्र निवडले आहे. त्याची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्यात येईल, त्यामुळे अपघात होऊन होणारी प्राणहानी, वित्तहानी टाळता येऊ शकेल. विद्युत अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबास चार लाख रुपये मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे दिले जातात. तसेच जखमी व्यक्तींना त्यांच्या औषधोपचार व दवाखान्याचा संपूर्ण खर्च दिला जातो. राज्यातील ग्रामीण भागात याकरिता जिल्हा शल्य चिकित्सकाच्या स्वाक्षरी ऐवजी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुखाची स्वाक्षरी बिलांवर चालू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबास सात दिवसात मदतीचा धनादेश व जखमींबाबत तीन महिन्यांत दवाखान्याच्या खर्चाची रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही केली जाईल. वेळेचा उपव्यय टाळण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी विभागीय संचालकांना अधिकार दिले आहेत, असे श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

शाखा अभियंता निलंबित

मौजे रोहकल, ता.खेड, जि.पुणे येथे 19 मे 2018 रोजी 22 केव्ही उच्च दाब उपरी तार मार्गातील वाय फेसचा विद्युत भारीत वाहक तुटून अपघात झाला. यात विशाल काचोळे व त्याच्या मातोश्री जखमी झाल्या यासंदर्भात संबधित शाखा अभियंत्यास निलंबित केले असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले. तसेच संबधित जखमी व्यक्तींच्या औषधोपचाराचा 1 लाख 55 हजार रुपयांचा खर्च तातडीने देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सदस्य सर्वश्री सुरेश गोरे, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, बच्चू कडू, बाळासाहेब थोरात यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला. 

जयभवानी साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत दोन महिन्यात कार्यवाही - सहकार मंत्री सुभाष देशमुख

नागपूर : जयभवानी सहकारी साखर कारखाना, ता.गेवराई, जि.बीड येथील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत संबंधितांसोबत बैठक घेऊन दोन महिन्यात कार्यवाही केली जाईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

येथील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असून त्याबाबत गृह विभागामार्फत सविस्तर चौकशी सुरु आहे तसेच कारखान्याकडून त्यांच्या कुटुंबास रक्कम दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. आत्महत्येमुळे कुटुंबास मिळणाऱ्या शासकीय मदतीसंदर्भात या कुटुंबास ती मिळाली की नाही, याचीही चौकशी केली जाईल, असे श्री.देशमुख यांनी स्पष्ट केले.

सदस्य सर्वश्री लक्ष्मण पवार, अजित पवार, जयंत पाटील, योगेश सागर यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.

राज्यात सर्वत्र वीज पुरवठा - ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात सर्वत्र मागणीनुसार वीज पुरवठा करण्यात येत असून, सध्या 14 हजार 400 मेगाव्हॅटची मागणी आहे. तेवढा वीजपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यावेळी ऊर्जामंत्री म्हणाले, काही ठिकाणी कमी दाबाचा पुरवठाही होत आहे. त्यासाठी मागणीनुसार वीज निर्मिती करण्यात येते. पोहरा पुर्णा, ता. भातुकली, जि. अमरावती येथे होत असलेल्या सिंगल फेज विद्युत पुरवठ्याबद्दल सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्न विचारला होता. त्यानुसार विद्युत विभाग करीत असलेल्या कारवाई बद्दल महावितरण कंपनीकडून पोहरा पुर्णा या गावामध्ये नवीन लघुदाब वीज वाहिनेचे 5 पोलचे काम व 10 स्पॅनचे (1 फेज 3 वायर ते 3 फेज 5 वायर) चे काम देखभाल व दुरुस्ती या योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आले असून वाहिनी दि. 12 जून 2018 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणची कमी दाबाच्या विजेची समस्या दूर झाली आहे. असे त्यांनी सांगितले.

सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, बसवराज पाटील यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.

अण्णासाहेब मगर सहकारी बँक अध्यक्षांच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरु - सहकार मंत्री सुभाष देशमुख

अण्णासाहेब मगर सहकारी बँक, भोसरी, जि.पुणे या बँकेसंदर्भात अध्यक्षांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत बँकेच्या सभासदांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी सुरु असून दोषींविरुद्ध जबाबदारी निश्चित करुन पुढील कारवाई करण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.

सदस्य सुभाष साबणे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता, त्यास उत्तर देताना सहकारमंत्री म्हणाले, लेखा परिक्षण अहवालातील गंभीर मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काळे यांनी भाग घेतला.

एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही - सहकार मंत्री सुभाष देशमुख

राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.

जामखेड, जि.अहमदनगर येथील शेतकरी धोंडीराम शिरसाट यांना कर्जमाफीपासून

ह्या विभागातील इतर बातम्या