होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

विधानसभा प्रश्नोत्तरे : जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना - बबनराव लोणीकर

विभाग : विधीमंडळ / 13 Jul 2018, 10:07AM
शेअर करा.

विधानसभा प्रश्नोत्तरे : जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना - बबनराव लोणीकर

नागपूर : राज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोग शाळांमध्ये एप्रिल 2018 मध्ये 53 हजार 512 पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली त्यापैकी केवळ नऊ टक्के नमुन्यांचे पाणी दूषित आढळले. तसेच जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्व्‍ाच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली.

दूषित पाण्यामुळे पटकी, कावीळ, विषमज्वर असे जलजन्य आजार पसरल्यास या जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. यात जलजन्य आजाराचे नियमित सर्वेक्षण, जलजन्य आजारासाठी आरोग्य संस्थांना आवश्यक औषध पुरवठा, पाणी शुद्धीकरणासाठी जलसुरक्षकांचे नियमित प्रशिक्षण, ग्रामविकास व पाणीपुरवठा विभागाच्या समन्वयाने नियमित स्वच्छता सर्वेक्षण, जलजन्य आजार प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण, शुद्धीकरण यंत्रणा, आर.ओ (RO) डीएफयू (DFU) आदी बसवून शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. राज्यात पाणी नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जलसुरक्षकांना उद्दिष्टानुसार पाणी नमुने गोळा करण्याचे काम यशस्वी करण्यास प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो, नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत रास्यस्तरावरुन विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे.

यासंदर्भात सदस्य राहुल कुल यांनी प्रश्न विचारला होता.

कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी - क्रीडामंत्री विनोद तावडे

नागपूर : कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाईल तसेच या संदर्भात आयआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

तसेच अधिवेशनाच्या काळातच या संदर्भात आमदारांसोबत बैठक घेण्यात येईल, असेही श्री.तावडे यांनी सांगितले.

सदस्य चंद्रदीप नरके व सत्यजीत पाटील यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता.


ह्या विभागातील इतर बातम्या