होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

मराठी माध्यमांच्या शाळांना भविष्यात चांगले दिवस -पोपटराव महाजन

विभाग : शैक्षणिक / 09 Jul 2018, 02:07PM
शेअर करा.

मराठी माध्यमांच्या शाळांना भविष्यात चांगले दिवस -पोपटराव महाजन

धामणीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप  

अंकुश भूमकर - Pune Star News Network 

लोणी धामणी : शालेय शिक्षणा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांना भविष्यात चांगले दिवस येणार आहेत .धामणी शाळेतील शनिवार विशेष उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचे मत आंबेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी धामणी येथील कार्यक्रमात व्यक्त केले

 धामणी(ता आंबेगाव)येथील  ग्रामपंचायत चौदावा वित्त आयोग निधीतून शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 32 विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास, वह्या व अन्य शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

  या कार्यक्रमाचे आयोजन जि.प. शाळेतील सभागृहात करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पोलीस  वामन शिंदे हे होते .यावेळी धामणी शाळेत तसेच ग्रामपंचायत मध्ये नव्याने नियुक्त झालेले शिक्षक ,व  ग्राविकास अधिकारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी धामणी जि.प .शाळेत आतापर्यंत लोकसहभागातून झालेली कामे ,शाळेतील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली. या वेळी जेष्ठ पत्रकार अॅड. विठ्ठल जाधव ,शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मेंगडे यांची मनोगते झाली

    या प्रसंगी ,शिक्षण विस्तार अधिकारी रामदास पालेकर,मा. सरपंच गजाराम जाधव ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन जाधव , उपसरपंच वैशाली बोऱ्हाडे, जेष्ठ नागरिक प्रभाकर पंचरास,शिवतीर्थ पतसंस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग ससाणे, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष दत्तात्रय गवंडी, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद शेळके, संगीता विधाटे, पुनम जाधव,भाऊसाहेब पंचरास,वि .वि. सोसायटी चे संचालक दिपक जाधव,सुधाकर जाधव , ग्रामविकास अधिकारी रुपेश मोरे ,अक्षयराजे विधाटे, राहुल जाधव, तानाजी रोडे ,मॅचिंद्र अमाप ,नाथा गोडवे ,अमोल जाधव, शिवाजी जाधव इ ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि. प.शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले यांनी केले तर आभार सरपंच सागर जाधव यांनी मानले


ह्या विभागातील इतर बातम्या