होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

निरगुडसर येथे बिबटयाने पाडला 25 कोंबड्यांचा फाडश्या

विभाग : पुणे जिल्हा ग्रामिण / 05 Jul 2018, 02:07PM
शेअर करा.

निरगुडसर येथे बिबटयाने पाडला 25 कोंबड्यांचा फाडश्या

अंकुश भूमकर, पुणे स्टार न्यूज नेटवर्क 
लोणी धामणी : निरगुडसर (ता.आंबेगाव )येथून जवळच असलेल्या हांडे वस्ती येथील राजू हांडे या शेतकऱ्याच्या पाळलेल्या गावठी कोंबडयावर  बुधवार दि .४ रात्री दोन ते अडीच च्या सुमारास बिबट्याने  हल्ला करून 25 कोंबड्या ठार केल्या आहे. त्यामुळे हांडे वस्ती आजुबाजुच्या परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

    रात्री  दोन ते अडीच च्या सुमारास बिबटया खुरड्यात घुसला असता राजू हांडे ,भरत हांडे ,राहुल हांडे ,गणेश हांडे ,यांनी घटनास्थळी जाऊन खुराड्यात गेलेल्या बिबट्याला कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खुराड्याच्या बाजूला पत्रे लावून त्याला बराच वेळ खुराड्यात पकडून ठेवले परंतु बिबट्याने नंतर पत्रा पाडून पळ काढला.  या दरम्यान अनेकवेळा वनअधिकारी यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही
           
या परिसरातील असलेल्या भोडवे वस्ती,बेटवस्ती  कारवस्ती येथे अनेकांच्या पाळीव जनावरांवर बिबट्या ने या अगोदर सुध्दा हल्ला केला आहे .या सततच्या घटनांमुळे निरगुडसर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या परिसरात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली असून  वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे व  संबंधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष राहुल हांडे.यासह स्थानिकांनी केली आहे. 

ह्या विभागातील इतर बातम्या