होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

विठ्ठल नामाच्या जयघोषात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

विभाग : पिंपरी चिंचवड / 05 Jul 2018, 02:07PM
शेअर करा.

विठ्ठल नामाच्या जयघोषात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

पिंपरी-चिंचवड : विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान झाले. यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार वाड्यात झाला. प्रस्थानापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी सपत्नीक तुकाराम महारांच्या पादुकांचे पूजन केले. यावेळी खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

पहाटे पाच वाजता मुख्य मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर सहा वाजता वैकुंठगमन स्थान मंदिरात महापूजा झाली. सकाळी सात वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधीपूजा झाली. सकाळी अकराच्या सुमारास सुनील घोडेकर यांनी तुकोबांच्या पादुकांना चकाकी देऊन त्या मसलेकर यांच्या डोक्यावर दिल्या. त्या पादुका म्हातारबाबा दिंडीने इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. दिलीप मोरे-इनामदार यांनी इनामदार वाड्यात पादुकांची पूजा केली. त्यानंतर पुन्हा बाराच्या सुमारास पादुका डोक्यावर घेऊन म्हातारबाबा दिंडीने मुख्य मंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आल्या. सकाळी दहा ते बारा या वेळेत संभाजी महाराज मोरे-देहूकर यांचे कीर्तन झाले.

संत तुकाराम महाराजांच्या 333 वा पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी लाखो भक्तांनी इंद्रायणीकाठी दाटी केली होती, राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. त्यातील काहींना तुकाबांच्या पादुकांवर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले. तर काहींनी मनोभावे नमस्कार करीत तुकोंबाचरणी आपली सेवा रुजू केली. यावेळी हरिनामाच्या गजरात अवघी देहुनगरी दुमदुमून गेली होती.

ह्या विभागातील इतर बातम्या