होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

विभाग : राजकीय / 12 Apr 2019, 12:04PM
शेअर करा.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

सचिन तोडकर, पुणे स्टार न्यूज नेटवर्क 

घोडेगाव ता.११:  आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील तळेघर येथील तरुणांनी आज खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची त्यांच्या लांडेवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची ध्येय धोरणे आणि खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन या निवडणुकीत आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जाऊन आपण शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचे यावेळी या तरुणांनी सांगितले.  

आजवर आम्हा आदिवासी तरुणांचा फक्त निवडणुकीपुरता वापर करण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. मात्र निवडून येताच आमच्याकडे पाठ फिरवली अशा भावना या तरुणांनी व्यक्त केल्या. खासदार आढळराव यांचे नेतृत्व आदिवासी भागाचा विकास करू शकते हे आता आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीत आदिवासी भागात वाड्या-वस्त्यावर जाऊन शिवशेनेचा प्रचार करून शिवाजीदादा आढळराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करणार करणार असल्याचे ह्या सर्व युवकांनी सांगितले. 

या वेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, अमोल अंकुश आदी उपस्थित होते.

खासदार आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या संकेत पांडुरंग कावळे, अजित अशोक इष्टे, विशाल शांताराम मेचकर, विशाल विष्णू इष्टे, विशाल किसण इष्टे, प्रदीप सुरश इष्टे, रामदास धर्मा मेमाने, संतोष येशवंत इष्टे, अक्षय येशवंत शेळकंदे, योगेश सखाराम धादवड, दिनेश सखराम धादवड, स्वप्नील पाडुरंग कावळे, सुमित पांडुरंग कावळे, विजय शिवाजी इष्टे, प्रफुल्ल पुनाजी  इष्टे, महेश काळू  इष्टे, संदीप काळू  इष्टे, मंगेश दशरथ शेळके, राहुल दशरथ शेळके, मयूर दशरथ शेळके, विनायक  रामचंद्र कोकणे,रोहन अशोक  इष्टे, त्रुशाल शांताराम मेचकर, नितीन अंकुश मेचकर, आदिनाथ ज्ञानेश्वर मेचकर, अभिषेक दत्तात्रय मोहंडूळे, निलेश वसंत  इष्टे, किशोर प्रभाकर हिले, वैभव ज्ञानेश्वर लोहकरे, विजय किसान जठर, सुरज अंकुश कोकाटे, विनोद मारुती विराणकर, संतोष आनंथा  इष्टे, सुदाम शांताराम  इष्टे, पुंडलिक विलास  इष्टे, अनिल गोविंड मेमाणे, दत्तात्रय शांताराम तिटकारे आणि किरण बाळू इष्टे आदी युवकांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.  

ह्या विभागातील इतर बातम्या