होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे

विभाग : राजकीय / 12 Apr 2019, 12:04PM
शेअर करा.

सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे

सचिन तोडकर, पुणे स्टार न्यूज नेटवर्क
कासारी ता.११: एखादा अभिनेता, अभिनेत्री आली कि लोक गर्दी करतात. काही वेळेला त्यांच्या इमेजला भुलतात, पण नंतर मात्र पश्चातापाची वेळ येते. अहो मुंबईतून राम नाईक यांच्यासारख्या कार्यक्षम, अभ्यासू खासदाराऐवजी लोकांनी गोविंदा या अभिनेत्याला निवडून दिले, पण काय झाले? गोविंदा यांनी आपल्या खासदारकीच्या पाच वर्षात एकदाही संसदेत तोंड उघडले नाहीच पण संसदेत उपस्थित हि राहिले नाहीत. त्या मतदार संघातील लोकांना नंतर पश्चाताप झाला, पण करणार काय? हि चूक सुधारण्यासाठी लोकांना पाच वर्षांची वाट पहावी लागली. पाच वर्षांचा काळ खूप मोठा असतो. तुम्ही लोकप्रतिनिधी चुकीचा निवडला तर तुमचा मतदार संघ इतर भागाच्या तुलनेत २० वर्ष मागे राहतो हे लक्षात घ्या. त्यामुळे मुंबईतील मतदारांनी केलेली चूक तुम्ही इथे करू नका. सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका. खासदार आढळराव पाटील हे या भागाचा सर्वांगीण विकास करताना सुख-दु:खात नेहमी जनतेच्या बरोबर राहिलेले व्यक्तिमत्व आहे. आपल्या भागचा, येथील जनतेचा विकास व्हावा अशी त्यांची तळमळ असते. त्यामुळे तळमळीने काम करणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करण्यासाठी येत्या 29 एप्रिलला धनुष्यबाना समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा" असे आवाहन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केले.

शिरूर तालुक्यातील पिंपळे-जगताप, कोरेगाव-भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, लांडेवस्ती, कासारी, निमगाव म्हाळुंगी, शिरूर शहर, सरदवाडी, कोंढापुरी, राऊतवाडी आदी गावांचा निवडणूक प्रचार दौरा आज खासदार आढळराव पाटील यांनी केला, त्यावेळी झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख शिवाजीराव कुऱ्हाडे, रयतक्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब फराटे, कैलास पाटील, घोडगंगाचे माजी संचालक कैलास सोनावणे, बापुसाहेब शिंदे, मच्छिंद्र गदादे, आदी सहभागी होते. गावागातील ग्रामस्थांनी खासदार आढळराव पाटील यांचे ढोलताश्यांच्या गजरात स्वागत केले, तर महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे आपल्या भाषणात म्हणाले कि, "खा.आढळराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे . आपल्या भागाचा विकास करण्यासाठी काय केले पाहिजे याचा दांडगा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यामुळे आज ७५०० कोटींचा पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प मंजूर होऊ शकला. कोकण रेल्वेचा प्रकल्प मंजूर व्हायला २८ वर्ष लागली, पण दादांची प्रत्येक केंद्रीये अर्थसंकल्पावरील चर्चेत हा विषय जोरदारपणे मांडला. सर्वांशीच चांगले सबंध असलेल्या दादांनी सुरेश प्रभूंकडे आग्रह करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला अशा कार्यक्षम खासदाराच्या मागे आपण ठामपाने उभे राहिले पाहिजे." 


ह्या विभागातील इतर बातम्या