होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’

विभाग : ठळक बातम्या / ताज्या घडामोडी / 11 Feb 2019, 09:02PM
शेअर करा.

एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ 

द्राक्षांची थेट बागेत जाऊन चव चाखण्याची पर्यटकांना संधी

मुंबई : द्राक्षांची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार कोणते, द्राक्षांपासून वाईनची निर्मिती कशी होते अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच द्राक्षांची प्रत्यक्ष शेतात जाऊन चव चाखण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी येत्या 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान द्राक्षगांव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळेगाव (लेण्याद्री) (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे द्राक्ष महोत्सव (Grape Festival) आयोजित करण्यात आला आहे. एमटीडीसीचे माळशेजघाट रिसॉर्ट आणि जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे.

ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर होत असलेल्या या महोत्सवात पर्यटक कोणत्याही एका दिवशी सहभागी होऊ शकतात. यासाठी पर्यटकांना सकाळी १० वाजता माळशेज घाट येथील एमटीडीसी रिसॉर्टवर पोहोचावे लागेल. त्यानंतर गोळेगाव येथील द्राक्ष बागेला प्रत्यक्ष भेट देऊन द्राक्ष पीकांबाबत माहिती, द्राक्षांची तोडणी, पॅकींग, विक्री कशी केली जाते याची पर्यटकांना माहिती दिली जाईल. पर्यटकांना द्राक्षांची थेट बागेत जाऊन चव चाखता येईल. याशिवाय थेट शेताच्या बांधावरुन द्राक्षांची खरेदी करता येईल. दुपारी १ वाजता ॲग्री टुरीजम युनिटला भेट, शेतात फेरफटका आणि तिथेच शेताच्या बांधावर बसून पर्यटकांना जेवणाचा आनंद घेता येईल. त्यानंतर वाईनरीला भेट देण्यात येईल. इथे पर्यटक द्राक्षापासून वाईन तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकतील. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता ग्रामीण बचतगटांच्या मशरुम बागेला भेट, मशरुम पीकाची महिती घेणे तसेच या पीकाची पॅकींग व विक्रीची माहिती पर्यटकांना घेता येईल. 

या सर्व स्थळांना भेटी देण्यासाठी प्रत्येकी फक्त ५० रुपये इतकी प्रवेश फी असून या स्थळांना भेट देण्यासाठी एमटीडीसीमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी पर्यटकांना माळशेज घाट येथील एमटीडीसी रीसॉर्टवर किंवा गोळेगाव (लेण्याद्री) (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे पोहोचावे लागेल. अधिक माहितीसाठी माळशेजघाट एमटीडीसी रिसॉर्टचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांच्याशी संपर्क साधावा (मोबाईल – ९८२२०४३१७५, ७७६८०३६३३२)

माळशेज घाट येथे कसे पोहोचावे ?

मुंबई येथील पर्यटक कल्याण मुरबाडमार्गे येथे पोहोचू शकतात. कल्याणपासून हे ठिकाण ९० किमी अंतरावर आहे. पुण्यातील पर्यटक राजगुरुनगर – नारायणगाव – आळेफाटा या मार्गे माळशेज घाट येथे पोहोचू शकतात. पुण्यापासून हे ठिकाण १२० किमी अंतरावर आहे. नाशिक येथील पर्यटक संगमनेर – आळेफाटा येथून या ठिकाणी पोहोचू शकतात.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.


ह्या विभागातील इतर बातम्या