होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विभाग : ठळक बातम्या / ताज्या घडामोडी / 11 Feb 2019, 09:02PM
शेअर करा.

पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“स्वारगेट मल्टीमोडल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब”चे भूमीपूजन आणि स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्प, स्मार्ट ऑपरेशन सेंटर आणि अन्य स्मार्ट सिटी प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात विविध प्रकल्प सुरू असून त्या माध्यमातून पुणे शहराचे परिवर्तन होत आहे. वाहतूक व्यवस्था हेच शहरांचे ग्रोथ इंजीन असून पुणे शहराच्या विकासाला अधिकची गती देण्यासाठी उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट- एचसीएमटीआर) काम जूनपर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. 

येथील कै.बाबुराव सणस मैदानावर “स्वारगेट मल्टीमोडल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब”चे भूमीपूजन आणि स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्प, स्मार्ट ऑपरेशन सेंटर आणि अन्य स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार सर्वश्री जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, महानगरपालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड-पीएमपीएमएल)चे संचालक सिद्धार्थ शिरोळे, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, फ्रान्सच्या (एजन्सी फ्रान्स डेव्हलपमेंट - ए.एफ.डी.)चे प्रादेशिक संचालक निकोलस फोरनेज, फ्रान्सच्या मुंबईतील काऊन्सल जनरल सोनिया बारब्री उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील शहरामधून 65 टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (जीडीपी) निर्मिती होत असते. त्यामुळे शहरांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. देशातील शहरांचा विकास साधण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी ही संकल्पना आणली. या माध्यमातून शहरांच्या विकासाला गती मिळाली आहे. पुणे मेट्रोमुळे पुणे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. पुणे मेट्रोच्या कामाची गती मोठी असून वेळेआधी सर्व प्रकल्प पूर्ण होतील. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा कोणत्याही शहराच्या विकासाचा कणा आहे. मात्र पुणे शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहराच्या प्रदुषणातही वाढ होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहरातील कोणत्याही ठिकाणी पाचशे मीटरच्या आत उपलब्ध हवी, मात्र त्यासाठी ग्रीन मोबिलीटीचा पर्याय आवश्यक आहे. स्वारगेट इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हबच्या माध्यमातून हे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या पीएमपीएमएलकडे सध्या केवळ 2 हजार बस असून त्यांना अजून दीड हजार बसेसची आवश्यकता आहे. यावर्षी महापालिकेने सीएनजी आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दीड हजार बसेसची खरेदी केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत पीएमपीएमएलकडे साडेतीन हजार बसेस उपलब्ध होणार आहेत. ही खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली असून या माध्यमातून प्रवाशांना साध्या बसच्या दरात एसी बसमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. 

इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हबच्या सिंगल ॲपच्या माध्यमातून बसची सध्याची स्थितीसह त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या जागेची स्थितीही प्रवाशांना सहज समजणार आहे. तसेच या माध्यमातून बस, मेट्रोमध्ये एकाच तिकीटावर प्रवास करता येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले.

पुण्याच्या विकासाचा ग्रोथ रोड ठरणाऱ्या 120 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे कामही सुरू करण्यात आले आहे. या विकासाच्या मार्गावरील बदलत्या पुण्यात सर्वसामान्य पुणेकरांसाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पुणे शहराची वाहतूक स्मार्ट व पर्यावरणपूरक करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी प्रकल्पाची संकल्पना देशात सुरू झाली. त्यामध्ये पुणे शहराचा सर्वात पहिल्यांदा समावेश करण्यात आला. पुणे शहर आणि परिसर सर्वात वेगाने विस्तारणारे शहर आहे. स्मार्ट सिटीमुळे याला गती मिळेल. 

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, मेट्रो आणि इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हबच्या माध्यमातून पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला गती मिळेल. शहराला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी इ-बस सेवेची सुरूवात करण्यात आली आहे. महिलांसाठी ३३ तेजस्विनी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. काही काळातच पीएमपीएमएलच्या माध्यमातून ५०० बसेस पुण्याच्या शहरात धावतील. येत्या दोन वर्षात जुन्या बसेस बंद करून नवीन सीएनजी अथवा इलेक्ट्रिक बसेस पीएमपीएमएलच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहेत. पुणे शहराच्या दळणवळणाला गती देणाऱ्या आणि शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या या प्रकल्पांचे लोकार्पण होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

सोनिया बारब्री म्हणाल्या, शहरी वाहतूक हा फ्रान्ससाठी महत्वाचा विषय आहे. प्रत्येक शहरांचा विकास होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बळकट करण्याची आवश्यकता आहे. पुणे हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे आर्थिक आणि औद्योगिक हब असणारे शहर आहे. पुणे शहराच्या विकासाला हा प्रकल्प गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, ब्रिजेश दीक्षित यांची भाषणे झाली. 

यावेळी पुणे मेट्रो व ए.एफ.डी. फ्रान्स यांच्यात प्रकल्प कर्ज व तांत्रिक सल्ला विषयक करारनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी महामेट्रोच्या प्रस्तावित कामांच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या विभागातील इतर बातम्या