होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके

विभाग : महत्वाच्या बातम्या / 02 Jan 2019, 07:01PM
शेअर करा.

सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके

पुणे:  सर्व शाळा,महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये यामध्ये कोणती छायाचित्रे लावायची याबाबत निर्णय घेणारी एक समिती आहे. या राज्य शासनाच्या महापुरूषांच्या छायाचित्रांना मान्यता देणार्‍या या समितीने आजवर फक्त थोर पुरूषांच्याच छायाचित्रांना मान्यता दिलेली होती. त्या मालिकेत एकाही कर्तबगार स्त्रिचा समावेश केलेला नव्हता. पहिल्या भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि शिक्षण तज्ञ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचा समावेश या मालिकेत करावा असा प्रयत्न मी सुरू केला तेव्हा खूप वाईट अनुभव आले. उच्च अधिकार्‍यांची पुरूषी मानसिकता पदोपदी आडवी येत होती.

आम्ही सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून दोन दशके उलटली. तरिही नागरिक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात. अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!

पुण्यातील गोपीनाथ एकनाथराव पालकर यांच्या जुन्या वाड्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे अस्सल छायाचित्र मिळाले. काचेच्या भल्यामोठ्या अस्सल कृष्णधवल निगेटिव्हवरील हा ग्रुपफोटो सुमारे दीडशे जुना असल्याने अस्पष्ट झालेला होता. राज्य शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीतर्फे त्या निगेटिव्हवरून जसेच्या तसे रंगित तैलचित्र तयार करून घ्यायचे ठरवले. प्रा.विलास चोरमले या चित्रकारांबरोबर अनेक बैठका झाल्या. त्यांनीही जीव ओतून सुरेख तैलचित्र [ हुबेहुब कृष्णधवल निगेटिव्हनुसार ] तयार केले. निळ्या साडीतील हे तैलचित्र अतिशय देखणे, ज्ञानी, कर्तबगार राष्ट्रमातेचे तैलचित्र आहे.

3 जानेवारीला नायगावच्या [ सावित्रीबाईंचे माहेर ] जयंती कार्यक्रमात ते प्रकाशित करायचे ठरवले. समोर अडचणींचा डोंगर उभा होता.त्यातूनच वाट काढावी लागली.खुप झटापट झाली. बड्या अंमलदारांशी झुंजावे लागले. मंत्रालयातील एका उपसचिवाने या कामात खूप खोडे घातले. त्यासाठी त्याने कागदोपत्री चक्क लबाड्याही केल्या. तत्कालीन मुख्य सचिव श्री. अरूण बोंगिरवार आपल्या प्रशासनाची बाजू चुकीची असल्याचे कळूनही उपसचिवाचे समर्थन करीत राहिले. खमक्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना खडे बोल सुनावले आणि त्यांचा निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांच्यासमोर विशद केले. सज्जड पुरावे बघितल्यावर बोंगिरवार नरमले.  

३१ डिसेंबरला अंतिम निर्णय झाला. सवित्रीबाईंच्या जयंती कार्यक्रमाला अवघे तीनच दिवस शिल्लक होते. त्यातले दोन दिवस शासकीय मुद्रणालयाला सुट्टी होती. निर्णय होऊनही जयंती समारंभात फोटो प्रकाशित करणे अशक्य होते.

अशावेळी माझे मित्र असलेले शासकीय मुद्रणालयाचे संचालक यांना मी साकडेघातले. ते मदतीला धावून आले. त्यांनी रात्रंदिवस अपार मेहनत केली आणि ३ जानेवारीला नायगावच्या शासकीय समारंभात सावित्रीबाईंचे अस्सल तैलचित्र प्रकाशित झाले.

त्या आधी सावित्रीबाईंची दोन काल्पनिक चित्रे प्रसिद्ध झाली होती. एकामागे सदभावना होती तर एकामागे पत्नीप्रेम!

एकाने सावित्रीबाईंचे चरित्र लिहून त्यावर पहिले चित्र छापले. एकदा एका कार्यक्रमाला त्यांच्या गावात गेलो असताना त्यांनी दुसर्‍या दिवशी घरी चहाला बोलावले. चहा पोहे द्यायला त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी त्यांना प्रथमच भेटत होतो. तरिही त्यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्याचा भास होत राहिला. तो ओळखीचा वाटत राहिला. घरी आल्यावर त्यांनी लिहिलेले सावित्रीबाईंचे चरित्राचे पुस्तक पाहिले आणि सगळा उलगडा झाला! माझं असं मत आहे की संशोधनाची कोणतीही शिस्त न पाळता, केवळ आंधळी भक्ती आणि स्वजातीप्रेम यातून त्या लेखकाकडून ही चूक झाली असणार.

दुसरे तैलचित्र बनवणारे चित्रकारही माझ्या ओळखीचे होते, पण त्यांनी एखाद्या सरदारपत्नीचे काढावे असे "वजनदार तैलचित्र" रंगवलेले होते.

आम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून १९ - २० वर्षे झाली, तरिही लोक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात. अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची दोन्ही चित्रे अस्सलबरहुकुम आहेत.

निळ्या साडीतले तरूण सावित्रीबाईंचे वरिल तैलचित्र अधिकृत आहे. ते मुळच्या अस्सल कृष्णधवल छायाचित्रावरून काढलेले आहे. ते प्रा. विलास चोरमले, अभिनव चित्रकला महाविद्यालय, पुणे, यांनी काढलेले आहे.

लाल काठाच्या साडीतले तैलचित्र हे त्यावरूनच काढलेले असले तरी ते वयस्कर सावित्रीबाईंचे तैलचित्र आहे. ते सुधीर काटकर, जे.जे. स्कूल आफ आर्ट्स, मुंबई, यांनी काढलेले आहे. ते पुण्यात महात्मा फुलेवाड्यात व नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकात लावलेले आहे.

या पोस्टसोबत दिलेली २ छायाचित्र /तैलचित्रे वगळता बाकी सर्व छायाचित्र /तैलचित्रे काल्पनिक आहेत.

-प्रा.हरी नरके

ह्या विभागातील इतर बातम्या