होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

अबब... चक्क घर गेले चोरीला... आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील घटना

विभाग : ठळक बातम्या / ताज्या घडामोडी / 02 Jan 2019, 05:01AM
शेअर करा.

अबब... चक्क घर गेले चोरीला... आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील घटना   

ग्रामपंचायतीनेच आपले घर नावावर करून घेतल्याचा मारुती कराळे यांचा आरोप.

पुणे स्टार न्यूज नेटवर्क 

मंचर : यापूर्वी विहीर चोरीला गेल्याचे एका मराठी चित्रपटात पहिले होते. मात्र आता आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागात चक्क एक घरच चोरीला गेल्याची तक्रार आंबेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. विहीर व घर या वस्तू तशा स्थावर स्वरूपाच्या व हलवता किंवा त्यांचे स्थलांतर करता न येण्यासारख्या आहेत. मात्र अशा स्थावर मालमत्तेची चोरी झाल्याची तक्रार जेंव्हा दाखल होते, तेंव्हा अशा अशक्य प्राय असणाऱ्या प्रकाराबाबत जाणून घेण्याची उत्स्तुक्ता सगळ्यांनाच लागते. चलातर मग जाणून घेऊयात काय आहे आंबेगाव तालुक्यातील घर चोरीला गेल्याचे प्रकरण... 

आंबेगाव तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मारुती कराळे, साबाजी कराळे व गंगाराम कराळे या बंधूंचे वडिलोपार्जित मिळकत नं. १३३ मध्ये ४६५ स्केअर फुटाचे कौलारू घर आहे. ग्रामपंचायत दप्तरी २००५ पर्यंत घराची नोंद मारुती कराळे यांच्या नावावर होती. तसा उतरादेखील कराळे कुटुंबाकडे आहे. कुटुंबातील वाटपात सदर घर सबाजी कराळे यांच्यावाट्यावर आल्याने सबाजी कारले या घराची नोंद आपल्या नावाने करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेल्यानंतर आपले घरच कागदोपत्री चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची लेखी तक्रार त्यांचे महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील नातेवाईक व राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सहसरचिटणीस प्रदीप पडवळ यांनी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्याकडे केली आहे. 

कराळे यांच्या मालकीचे मिळकत नं. १३३ मधील ४६५ चौ.फुटांचे घर सन २००६ मध्येच ग्रामपंचायतीने मासिक सभेचा ठराव करून बेकायदेशीररित्या 'सरपंच ग्रामपंचायत कारेगाव' यांच्या नावावर करुन घेतले आहे. विशेष म्हणजे हे घर जरी कागदोपत्री 'सरपंच ग्रामपंचायत कारेगाव' यांच्या नावावर असले तरी त्या घराची घरपट्टीची रक्कम दरवर्षी कराळे यांच्याकडून वसूल केली जाते. घराचा उतारा मिळण्यासाठी कराळे यांनी अनेकदा अर्ज केला. परंतू उतारा ग्रामपंचायतीकडून दिला जात नाही. कागदोपत्री चोरीला गेलेल्या या घराचे सध्याचे मालक सबाजी कराळे मात्र आपल्या घराचा उतारा दुरुस्थ व्हावा या साठी न हरता गेल्या तेरा वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये खेटा मारत आहेत. 

कराळे कुटुंबाच्या झालेल्या या फसवणुकी बाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे व आंबेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल काळभोर यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी कारले यांचे नातेवाईक प्रदीप पडवळ यांनी अर्ज केला आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कराळे कुटुंबियांना त्यांचे घर मिळवून द्यावे अशी मागणी कराळे व पडवळ यांनी केली आहे. एवढे करूनही घराचा ग्रामपंचायत दप्तरातील उतारा दुरुस्त झाला नाही व या घरावर पुन्हा कराळे यांची मालकी लागली नाही तर मात्र याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रदीप पडवळ व साबाजी कराळे यांनी सांगितले.

ह्या विभागातील इतर बातम्या