होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

मांदळेवाडी येथे चोरट्यांची मायलेकींना जबरी मारहाण, आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील घटना

विभाग : ठळक बातम्या / ताज्या घडामोडी / 30 Dec 2018, 03:12AM
शेअर करा.

मांदळेवाडी येथे चोरट्यांची मायलेकींना जबरी मारहाण,

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील घटना

राजू देवडे, पुणे स्टार न्यूज

पारगाव (कारखाना): पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आंबेगाव शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या मांदळेवाडी गावात जबरी चोरी करून चोरट्यांनी मायलेकींना जबर मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीी घडली.

मांदळवाडी गावातील धरण वस्तीवर वास्तव्यास असणाऱ्या तुकाराम आदक यांच्या घरावर रात्री उशिरा चोरट्यांनी दरोडा टाकून चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मायलेकींना जबर मारहाण करण्यात आली, त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत सौ.मंदा तुकाराम आदक व त्यांची मुलगी प्रियांका देवकर या दोघींंना जबर मारहाण करण्यात आली आहे. या दोघींना लोणी येथील डॉक्टर काळे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मंदा आदक यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले असून तो स्पष्टपणे दिसत आहे. प्रियंका हिची प्रकृती स्थिर असून मंदा आदक यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत चोरट्यांनी आठ हजार रूपये रोख रक्कम व अडीज तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरिक्षक अर्जुन शिंदे करत आहेत.

मांदळेवाडी गावात कुठल्याच मोबाईल कंपनीला रेंज मिळत नसल्याने मध्यरात्री चोरीची घटना घडल्यानंतर ही घटना पहाटे पाच वाजता उघडकीस आली. मांदळवाडी, लोणी-धामणी ते मंचर हे अंतर साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर असल्याने व शेजारी दुसरे तालुक्याची हद्द लागत असल्याने चोरटे चोरी करून पळून जाण्यात यशस्वी होतात.  त्यामुले गेल्या अनेक वर्षापासून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पोलीस चौकी  व्हावी अशी मागणी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक करत आहेत. या मागणीचा आतातरी गांभिर्याने विचार करावा अशी विनंती या भागातील रहिवाशांनी पुणे स्टार न्यूज च्या माध्यमातून केली आहे.

ह्या विभागातील इतर बातम्या