होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

माझ्या मते : शेतकरी आत्महत्तेला सरकारची चुकीची धोरणे जबबदार - वैभव उंडे

विभाग : राजकीय / 22 Dec 2018, 05:12AM
शेअर करा.

माझ्या मते : शेतकरी आत्महत्तेला सरकारची चुकीची धोरणे जबबदार - वैभव उंडे 

मंचर - दररोज सकाळी वर्तमानपत्र उघडले की, काय दिसते तर शेतकऱ्याचे गळफास घेऊन, किटकनाशके पिऊन आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या का करतात याची कारणे शोधली तर काय दिसते नैसर्गिक आपत्ती असतील, पण सर्वात मोठे कारण मला तर वाटते ते मानव निर्मित ते म्हणजे सरकारी पातळीवरील नियोजन, शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबविने गरजेचे आहे. पण तसे काही दिसत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळायला हवा. पण तो मिळत नाही, शेतकरी संघटनेचे पुढारीही यावर काही प्रभावी उपाय करत नाहीत. 

खते-औषधें, बियाणे, वीजबिल शेतीसाठी लागणारी औजारे, पेट्रोल, डिझेल च्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बँकांचे व्याजदर प्रचंड वाढले आहे, शेतीत राब राब राबून कोणताही माल पिकवला तर त्याला भाव मिळेल कि नाही याची अजिबात शास्वती नाही. आजची शेती म्हणजे रामभरोसे शेती असा प्रकार झाला आहे. त्यामुळे या जगाच्या पोशिंदयालाच उपाशी राहण्याची वेळ आली आहे. 

अनेक संकटे शेतकऱ्यासमोर आ वासून उभी आहे. कसे त्याने आपल्या मुलाबाळांचे पालनपोषण, शिक्षण करायचे. हे कमी झाले का काय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यावा असे शेतकऱ्याला वाटले तर सगळीकडे ऑनलाईन माहिती भरायची. एक तर ते अडाणी, त्यांनी कुठे जायचे ही माहिती भरायला. मग तो नको ती योजना अशीच शेतकऱ्याची मानसिकता होते. 

सरकारने शेतकऱ्याला कर्जमाफी केली. त्यात अनेक नियम व अटी ठेवल्या. हे सर्व पाहिले की मग विचार येतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी चा फायदा झाला असेल कि नाही. झाला असेल तर तो अगदी नगण्य प्रमाणात. आज वर्तमानपत्रात बातमी होती की पुणे-बारामती च्या शेतकऱ्यांनी फुकट कांदा द्यायला सुरुवात केली. का शेतकरी आत्महत्या करणार नाही, ह्या सगळ्या गोष्टीना जवाबदार कोण आहे? तर हे बेजबाबदार सरकार, चुकीची सरकारी धोरणे, आज राज्यात 146 तालुक्यात भयानक दुष्काळ आहे त्यावरती सरकारचे काही नियोजन दिसत नाही. हे शेतकऱ्यांच्या संदर्भात होत आहे. पण बाकी औद्योगिक, वाहतूक, शिक्षण असे कोणतेही क्षेत्र घेतले तर काही वेगळी परिस्थिती नाही. अडचणीत नोकर भरती नाही, आरोग्याबाबतही अनास्था पाहायला मिळते. हे पाहिले तर एकच गोष्ट लक्षात येते. गेंड्याची कातडी असलेले सरकार कधी या बाबींचा विचार करेल कि नाही. म्हणून आपण प्रत्यकाने विचार करून या बेजवाबदार सरकारला धडा शिकवला पाहिजे. 

- श्री वैभव नामदेव उंडे 

(चिटणीस, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)


ह्या विभागातील इतर बातम्या