होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

अतिक्रमण व अपंग कायद्याची अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

विभाग : थेट गावातून / 19 Dec 2018, 07:12AM
शेअर करा.

अतिक्रमण व अपंग कायद्याची अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

अंकुश भूमकर : Pune Star News

लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव तर्फे अवसरी बु.ही एक महत्वाची बाजारपेठ असून गावात भरपुर प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. गावातील रस्ते अतिक्रमणे वाढल्याने रुंदी कमी होत चालली असून ही अतिक्रमणे काढणे व अपंग व्यक्तींना शासन निर्णयानुसार व्यवसाय गाळे ,200 चौ.फू.जागा देने, अपंग कायदा 2016 ची अंमलबजावणी करणे  या मागण्यांसाठी अपंग हित, विकास व पुनर्वसन संघ अध्यक्ष दिपक ढोबळे यांनी अर्ज केले होते.या अर्जाच्या अनुषंगाने आज  उपजिल्हाधिकारी जयश्रीताई कटारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून गावातील गायरान क्षेत्रावरील अतिक्रमणे 15 जानेवारी पर्यंत काढण्यात यावी, रस्ते व खुल्या जागा याची मोजणी करून तात्काळ कार्यवाही करावी, अपंग व्यक्तींना प्रत्येक गावात 5% व्यवसाय गाळे आरक्षित ठेवावे असे आदेश देण्यात आले.

तहसीलदार आंबेगाव यांना तालुक्यातील प्रत्येक गावातील गायरान मोकळे करावे असे आदेश देण्यात आले.अपंग व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी अवहेलना, अपमान केल्यास अपंग कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. प्रत्येक तालुक्यात अपंग व्यक्तींचा 3% निधी खर्च व्हावा म्हणून आमदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी असे आदेश देण्यात आले.यावेळी तक्रारदार दिपक ढोबळे, उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, तहसीलदार सुषमा पैकीकरी, गट विकास अधिकारी राहुल काळभोर,उपअधीक्षक भूमी अभिलेख  अशोक शीलवंत, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद पंचायत विभाग श्रीम.निलेशा जाधव विस्तार अधिकारी पंचायत समिती अनिल देसाई, ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजने या अधिकाऱ्यां सोबत पारगावचे सरपंच बबन ढोबळे, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, अनिल मेमाणे, रमेश शिंदे इत्यादी लोक उपस्थित होते.

ह्या विभागातील इतर बातम्या