होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

पिंपळगावच्या श्रीराम विद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षेत 350 विद्यार्थी सहभागी

विभाग : थेट गावातून / 01 Dec 2018, 11:12PM
शेअर करा.

पिंपळगावच्या श्रीराम विद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षेत 350 विद्यार्थी सहभागी

- प्रत्येक विद्यार्थ्यला दिले जेल पेन आणि प्रमाणपत्र 

- तारुण्यवेध संघटनेचा उपक्रम

मंचर : पिंपळगाव (खडकी) येथील श्रीराम विद्यालयात तारुण्यवेध संघटनेने शाळेच्या सहकार्याने 28 नोव्हेंबर रोजी सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेमध्ये 350 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि जेल पेन भेट देण्यात आला

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित केली होती. सामान्य ज्ञान परीक्षेचा पेपर 50 गुणांचा होता.  दिवाळीच्या सुट्टी अगोदर सर्व विद्यार्थ्यांना साधना बालकुमार दिवाळी पुस्तिका वाटप करण्यात आली होती. त्यातील सहा गोष्टींवर परीक्षेचे प्रश्न होते, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विकास पोखरकर यांनी दिली. 

स्पर्धा घेण्यासाठी विशेष प्रयत्न

तरुण्यवेधचे उपाध्यक्ष राहुल पोखरकर पाटील, संघटक अनिल चव्हाण, सचिव ओंकार अरगडे, खजिनदार विपुल गोसावी, कार्यध्यक्ष रविराज थोरात, संघटक डॉ. आरजू तांबोळी, संस्थापक - संघटक विशाल विमल, शाळेचे मुख्याध्यापक भीमराव जाधव, शिक्षक, कर्मचारी यांनी स्पर्धा घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले, अशी माहिती तरुण्यवेधचे उपाध्यक्ष राहुल पोखरकर पाटील यांनी दिली. 

- डिसेंबर महिन्यात बक्षीस वितरण

 सहावी ते सातवी लहान गट आणि आठवी ते दहावी मोठा गट असे दोन गट होते.  या गटातुन प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत.  दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 1 हजार, 750 रुपये, 500 रुपयांची भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र बक्षीस वितरण समारंभात दिले जाणार आहे, असे विकास पोखरकर यांनी सांगितले.

ह्या विभागातील इतर बातम्या