होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

पिंपळगाव येथील श्रीराम विद्यालयात तारुण्यवेध संघटनेच्या वतीने होणार सामान्य ज्ञान परीक्षा

विभाग : शैक्षणिक / 23 Nov 2018, 06:11AM
शेअर करा.

पिंपळगाव येथील श्रीराम विद्यालयात तारुण्यवेध संघटनेच्या वतीने होणार सामान्य ज्ञान परीक्षा

- सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तू
- क्रमांक संपादन केल्यास पारितोषिक

मंचर:  श्रीराम विद्यालय पिंपळगाव - मंचर येथे तारुण्यवेध संघटनेने शाळेच्या सहकार्याने 28 नोव्हेंबर रोजी सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. 

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा होणार आहेत. या परीक्षेमध्ये सहभागी होणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. सामान्य ज्ञान परीक्षेचा पेपर 50 गुणांचा असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले जाणार असून योग्य त्या पर्यायाच्या उत्तरावर खूण करायची आहे. दिवाळीच्या सुट्टी अगोदर सर्व विद्यार्थ्यांना साधना बालकुमार दिवाळी पुस्तिका वाटप करण्यात आली होती. त्यातील सहा गोष्टींवर सामान्य ज्ञान परीक्षेचे प्रश्न असणार आहेत. सहावी ते सातवी लहान गट आणि आठवी ते दहावी मोठा गट असणार असून या गटातुन प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात येणार आहे. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 1 हजार रुपयांची भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र, 750 रुपयांची भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र, 500 रुपयांची भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657449328

ह्या विभागातील इतर बातम्या