होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

धमणीत किल्ले बनवा स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

विभाग : थेट गावातून / 10 Nov 2018, 07:11AM
शेअर करा.

धमणीत किल्ले बनवा स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

अंकुश भूमकर : Pune Star News Network

लोणी धामणी : दिपावली निमित्त आम्ही धामणीकर प्रतिष्ठान च्यी वतीने भव्य किल्ला बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

लक्ष्मीपुजन आणि पाडवा या दोन दिवशी धामणी आणि परिसरातील तब्बल ७०ते ८० किल्ले प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पाहिले. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याविषयी अधिक माहिती व्हावी आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची युवा पिढी निर्माण व्हावी हा उद्देश या स्पर्धेमागे होता. 

     आम्ही धामणीकर प्रतिष्ठानचे हे १० वे वर्ष आहे गेली १० वर्ष झाली प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित आहे. विशेष म्हणजे त्या सर्व स्पर्धकांना (किल्लेदाराना) दरवर्षी एका नविन किल्ल्याची सफर मोफत घडविण्यात येते.

                 याहीवर्षी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. १ते ५ याप्रमाणे प्रत्येक नंबर मध्ये २ या प्रमाणे १० नंबर काढण्यात आले. आणि ३ उत्तेजनार्थ नंबर काढण्यात आले.

प्रथम क्रमांक - सुजल विधाटे, श्लोक कुंभार(पन्हाळा किल्ला), ओम दहिवळ (रायगड).

द्वितीय क्रमांक - साहील देशमुख (शिवनेरी), वेदांत डोळस.

तृतीय क्रमांक - कार्तिक दहिवळ, सुमीत बढेकर.

चतुर्थ क्रमांक - सिद्धार्थ तांबे, काजल पंचरास.

पाचवा क्रमांक - रोहन रोकडे, ओंकार बोऱ्हाडे.

उत्तेजनार्थ - श्रीराम बोऱ्हाडे, साईदिप जाधव, यश गाढवे.

या सर्व स्पर्धकांना एकुण ५५०० रु. रोख बक्षिसे वाटण्यात आली. 

     दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व ७० स्पर्धकांना प्रसन्नगड(हडसर)या किल्लावरती मोफत सफर घडवणार आहे

      या स्पर्धेचे बक्षीस वितरण भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर सकाळी ९ वा. पार पडले.

           यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, अॅड विठ्ठलराव जाधव पाटील, सरपंच सागर सुनिलदादा जाधव पाटील. मा. सरपंच अंकुश भुमकर, मा. सरपंच सुनिलदादा जाधव पाटील, बापु मामा काचोळे, मधूकर जाधव, धनंजय जाधव, रुपेश जाधव, संतोष पंचरास, नयन बोंब, अक्षयराजे विधाटे, ज्ञानेश्वर विधाटे, गोरक्ष तांबे, दिनेश जाधव, अजित जाधव सर, छोटु जाधव, शिवाजी जाधव त्याचप्रमाणे बहुसंख्येने ग्रामस्थ आणि स्पर्धक उपस्थित होते.

ह्या विभागातील इतर बातम्या