होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

वाढदिवस खर्चाला फाटा देत केली शाळेला मदत, धामणीच्या बोऱ्हाडे परिवाराकडून जि.प.शाळेला पाच हजार रुपये देणगी

विभाग : थेट गावातून / 26 Sep 2018, 03:09PM
शेअर करा.

वाढदिवस खर्चाला फाटा देत केली शाळेला मदत, धामणीच्या बोऱ्हाडे परिवाराकडून जि.प.शाळेला पाच हजार रुपये देणगी

अंकुश भूमकर : Pune Star News Network 

लोणी धामणी : हल्ली वाढदिवस म्हंटलं की महागडी कपडे, ब्रॅण्डेड कंपनीचा केक ,सजावट, हॉटेल बुकिंग, डी जे ,पार्टी ,गिफ्ट, इ वारेमाप खर्च केला जातो आहे परंतु धामणी (ता आंबेगाव) येथील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या सोमनाथ फकिरा बोऱ्हाडे यांनी आपला मुलगा सिद्धेश याचा सहावा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करून अनिष्ट प्रथांना आळा घालत जिल्हा परिषद शाळेला पाच हजार रुपये देणगी दिली आहे .

       विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक दिपक जाधव व सामाजिक कार्यकर्ते विक्रम बोऱ्हाडे यांच्या हस्ते देणगी रक्कम जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

    या प्रसंगी फकिरा तुकाराम बोऱ्हाडे, सोमनाथ,अविनाश बोऱ्हाडे,सर्व शिक्षक वृंद ,तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते

   या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले .

     बोऱ्हाडे यांनी वाढदिवस खर्च टाळून शाळेला केलेल्या मदतीचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

ह्या विभागातील इतर बातम्या