पाईट गावाच्या विकासासाठी ०३ कोटी रुपयांचा निधी - शरद बुट्टे पाटील
धनंजय तोडकर : Pune Star News Network
पाईट : पाईट हे माझ्या जिल्हा परिषद गटातील व खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मोठे गाव आहे. या गावात अनेक वाड्या वस्त्यांचा विस्तार झालेला असून या ठिकाणी अनेक विकास कामे करणे गरजेचे आहे. म्हणूनच या आर्थिक वर्षात पाईट व वाड्या-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्याचे नियोजन केले असून त्यासाठी जवळपास ०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
शरद बुट्टे पाटील यांनी या निधी अंतर्गत पाईट गावात करावयाच्या कामांची पाहणी व नियोजन करण्यासाठी बांधकाम खात्याचे अधिकारी व स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पाईट गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी व कार्यकर्त्यांची चर्चा करताना बुट्टे पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली.
बुट्टे पाटील यांच्या प्रयत्नातून या आर्थिक वर्षात पाईट गावात नियोजित केलेली विकास कामे पुढील प्रमाणे-
कुंभार आळी समाज मंदिर,
दलित वस्ती अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण,
माळवाडी ठाकरवाडी पत्र्याचे शेड,
अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण,
लोढुंगवाडी ठाकरवाडी सिमेंट काँक्रिटीकरण,
कोमलवाडी गणेश मंदिर सभामंडप,
मस्जिद जोड रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण,
चिखलवाडी जोड रस्त्यावरील मोरी चे काम,
लोडूंगवाडी शाळा दुरुस्ती,
गावठाणातील ग्रामपंचायतीने केल्यानंतर राहिलेले उर्वरित रस्ते, यामध्ये मुस्लिम गल्ली,
चौक परिसर व
उर्वरित रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे,
सोपावस्ती व सावंतवाडी अंगणवाडीचे बांधकामे,
जुन्या अंगणवाडीच्या दुरुस्ती,
गवारवाडी सभामंडप,
पापळवाडी गवारवाडी साठी पाणी पुरवठा योजना,
सावंतवाडी व करंडवाडी पाणी योजनेचे विस्तारीकरण,
आरोग्य केंद्राच्या आवारातील रस्ते,
गेट ,वेटिंग शेड व गेस्टरूम यांची बांधकामे,
जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या गावठाणातील पशुवैद्यकीय दवाखाना व आरोग्य उपकेंद्र इमारतीचे जागेत आठवडे बाजार विकसित करणे,
अद्यावत सार्वजनिक शौचालय बांधणे,
गावडे वस्ती रस्ता तयार करणे,
मुस्लिम दफनभूमी कंपाऊंड,
सावंतवाडी स्मशानभूमी परिसर सुधारणा,
मुख्य चौकात हायमास्ट दिवे लावणे,
यासह अनेक कामांचा समावेश आहे.
गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 24 तास वीज उपलब्ध करून देण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच ते कार्यान्वित होईल. ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यायामशाळा साहित्य व ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.
गायमुख कडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व सावंतवाडी रस्त्याचे काही डांबरीकरण पूर्ण केले असून उर्वरित कामांसाठी देखील प्रयत्नशील असल्याची माहिती यावेळी बुट्टे पाटील यांनी दिली.