होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

मंत्रिमंडळ निर्णय : यवतमाळसह सांगलीतील पेठ येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापणार

विभाग : विधीमंडळ / 18 Sep 2018, 04:09AM
शेअर करा.

मंत्रिमंडळ निर्णय : यवतमाळसह सांगलीतील पेठ येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापणार

मुंबई : राज्यात आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी यवतमाळ व सांगलीतील मौजे पेठ (ता. वाळवा) येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (Food Technology Colleges) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ग्रामीण भागात अन्नतंत्रज्ञ, तज्ज्ञ प्रशिक्षक, अन्न निरीक्षक व कृषी मदतनीस निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगास चालना मिळणार आहे.

आजच्या निर्णयानुसार यवतमाळ येथे शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील मौजे पेठ येथे क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहेत. या महाविद्यालयांची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष 40 इतकी असणार आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीने निश्चित केल्याप्रमाणे शिक्षकवर्गीय 47 पदे आणि शिक्षकेत्तर 83 पदे अशी एकूण 130 पदे तत्त्वत: मंजूर करण्यात आली आहेत. यानंतर या पदांना उच्चस्तर समितीची मान्यता घेण्यात येईल. महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी पुढील पाच वर्षासाठी वेतनासह इतर आवर्ती आणि अनावर्ती खर्चासाठी 102 कोटी 8 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच मौजे पेठ येथील कृषी विभागाच्या ताब्यातील जमीन महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

ह्या विभागातील इतर बातम्या